महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून ही साखळी मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' (Break the Chain) ही मोहिम सुरु केली आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सर्वोतोपरी काळजी घेत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी बेड न मिळणे, औषधं न मिळणे, ऑक्सिजन तुटवड्याच्या तक्रारी देखील येत आहेत. या सर्वांबाबत आज आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आढावा घेतला. दरम्यान बेड नाही हे उत्तर सहन केले जाणार नाही असे कडक शब्दांत आरोग्य विभागाला राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
बेड मॅनेजमेंटसाठी मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. बेडची संख्या वाढली पाहिजे. बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. आता 15 दिवस गॅप घेत आहोत. तर बेड वाढवले पाहिजेत. हॉस्पिटलमध्ये जागा नसेल तर चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये बेड वाढवा. रुग्णालयांचे 80% बेड ताब्यात घेतले पाहिजेत. कोविड नियमावली बनवली पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, असंही टोपे म्हणाले.हेदेखील वाचा- महाराष्ट्रात येत्या 15 दिवसांत Coronavirus रुग्णांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता; 30 एप्रिलपर्यंत उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या होईल 11.9 लाख- CM Uddhav Thackeray
खासगी रुग्णालयांचे ऑडिट चेक केलं पाहिजे. खासगी रुग्णालयांनी बिलं काढताना प्रोटोकॉल पाळणं आवश्यक आहे. तसेच चोवीस तासात टेस्टिंग रिपोर्ट आलाच पाहिजे हा दंडक आहे, असंही ते म्हणाले. ते म्हणाले की, सध्या होम आयसोलेशनवर भर आहे त्यामुळे संपूर्ण घर इन्फेक्ट होत आहे. प्रत्येकाची विचारपूस करून इन्स्टिट्यूशनल आयसोलेशन केलं पाहिजे, असं टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात मागील 24 तासांत 61,695 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 36,39,855 वर पोहोचली आहे. तर 349 नव्या कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 59,153 वर पोहोचला आहे.