पाणी मुरतंय? भाजप मंत्री बबनराव लोणीकर यांनी कारखाण्याची जमीन हाडपली?, शेतकऱ्यांकडून आरोप
Babanrao Lonikar | (photo courtesy: archived, edited, symbolic images)

गल्ली ते दिल्ली पारदर्शी कारभाराचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपसाठी मंत्र्यांवर होणारे भ्रष्टाचार आणि घोटाळ्याचे आरोप एक डोकेदुखीच बनली आहे. भाजपच्या एकनाथ खडसे ( Eknath Khadse), प्रकाश मेहता (Prakash Mehta), विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde) आदी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर या यादीत आता आणखी एका नावाची भर पडली आहे. हे नाव आहे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर (Babanrao Lonikar) यांचे. मंत्री लोणीकर यांनी साखर कारखाण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून पैसे गोळा केले. तसेच, या पैशांतून खरेदी केलेली जमीन लोणीकर यांनी हडप केली, असा धक्कादायक आरोप करण्यात येत आहे. भाजप मंत्र्यांवर असे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. परंतु, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवता थेट मंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होणे हे मुख्यमंत्री फडणवीस (Cm Fadnavis) यांच्या सरकारसाठी धोकादायक ठरु शकते.

बबनराव लोणीकर यांच्यावर प्रमुख आरोप काय?

  • बबनराव लोणीकर चतुर्वेदेश्वर साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक आहेत. या कारखान्यासाठी सन 2000मध्ये जमीन खरेदी करण्यात आली.
  • खरेदी केलेल्या जमीनीचा सातबारा आणि खरेदी खत कारखान्याच्या नावे होते. मात्र, 2012मध्ये
  • लोणीकर यांनी आमदार असतानाच्या काळात पदाचा गैरवापर केला.
  • कारखान्याच्या नावे खेरेदी केलेली जमीन लोणीकर यांनी मुलगा राहुल, पत्नी, नातू आणि इतर नातेवाईकांच्या नावावर केली. त्यासाठी पदाचा वापर केला.

एबीपी माझा या वृत्तवाहिणीने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, हे प्रकरण जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील आहे. तालुक्यातील लोणी गावच्या शिवारात चतुर्वेदेश्वर कारखान्यासाठी सुमारे 50 एकर जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीनच लोणीकर यांनी हडपल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. येथील शेतकऱ्यांनी हा आरोप केला असूस, त्यााबत जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकक्षकांकडेही तक्रार करण्यता आल्याचे समजते. दरम्यान, शेतकऱ्यांची तक्रार जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांनीही गांभीर्याने घेतली नसल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात एक याचिकाही दाखल झाली असून, न्यायालयाने पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना तसेच, साखर आयुक्तांना आपले म्हणने लवकर मांडवे यासाठी नोटीस बजावल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. (हेही वाचा, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले हे महत्वाचे 13 निर्णय)

दरम्यान, प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत लोणीकर यांनी, होय, मी लोकांकडून शेअर्स घेतले. पण, काही काळाने लोकांचे पैसेही परत केले. काही शेतकऱ्यांनी आमच्याकडून पावत्या घेतल्या. पण, आजून पैसे मात्र दिले नसल्याचे सांगितले आहे.