thane trans harbour line disrupted | (File Photo)

ठाणे रेल्वे स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्या कारणाने ठाणे ट्रान्सहार्बरवरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळत आहे. तसचे या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे ते नेरुळ रेल्वे 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहे. सकाळच्या मोक्याच्या वेळी रेल्वेचा असा गोंधळ झाल्याने प्रवाशांमधून नाराजीचा सूर व्यक्त होताना दिसत आहे.

ट्रान्सहार्बर वर शक्यतो रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा प्रकार जास्त घडत नाही. असे असताना आज अचानक सकाळच्या सुमारास रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. सकाळी कामावर जाणा-या नोकरदार वर्गाला या समस्येचा फटका बसला असून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ऐन गर्दीच्या वेळी ट्रान्सहार्बर मार्गावर झालेल्या गोंधळामुळे ठाणे ते नेरुळ रेल्वे सेवा 5 ते 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. ठाणे स्थानकात झालेला तांत्रिक बिघाड दुरुस्तीचे काम सुरु असून लवकरच ट्रान्सहार्बरची सेवा सुरळीत होईल.