ठाणे (Thane) जिल्ह्यातील डोंबिवली शहरात एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली आहे. मोबाईलचा अतिवापर (Over Excessive Mobile) केल्याने मोठा भाऊ ओरडल्याने ही मुलगी नराज झाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उलचले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना डोंबिवली (Dombivli) येथील शेलार नाका परिसरात 19 मे रोजी घडली. पोलिसांनी पुढे सांगितले की, या मुलीला मोबाईल वापरण्याचे व्यसन होते. ती मोबाईलचा अतिवापर करत होती. जणू तिला मोबाईलचे व्यसनच (Mobile Addiction) लागले होते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करुन देत तिच्या मोठ्या भावाने तिला रागे भरले. तसेच, तिने पुन्हा मोबाईल वापरु नये यासाठी त्याने तिच्या मोबाईल डिव्हाईसमधून सिमकार्डही काढून टाकले. त्यामुळे चिडलेल्या मुलीने गळफास घेतला आणि आत्महत्या केली. घडल्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा, ठाणे: मीरा रोड येथे 13 वर्षीय मुलाची आत्महत्या; पालकांनी मोबाईल काढून घेतल्याने उचलले टोकाचे पाऊल)
पाठमागील काही वर्षांपासून असे अनेक अभ्यास होत आहेत. ज्यात मोबाईलचा वाढता वापर आणि त्याचा मानवी मनावर, शरिरावर पर्यायाने समाजावर होणारे दुष्परीणाम याचे मोठमोठे आकडे पुढे येत आहेत. प्रामुख्याने तरुणाईमध्ये वाढत असलेला मोबाईलचा वापर हा त्यांच्या करिअरच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आहे.
लहान मुलांमध्येही मोबाईल पाहण्याचे प्रचंड व्यसन वाढीला लागत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये अकाली वाढणारी समज, गरजेपेक्षा माहितीचा होणारा अधिकचा पुरवठा, नको त्या विषयातील अनावश्यक ज्ञान, बदलत्या सवयी यांचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांमध्ये मोबाईल वापराचे आणि पाहण्याचे वाढते प्रमाण हा एक सामाजिक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांनी मुलांच्या या व्यसनाला वेळीच आवर घालावा, असे मत अभ्यासक आणि वैद्यकीय विभागातील खास करुन मानसशास्त्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात.