स्वाईन फ्लू (Swine Flu) संसर्ग होऊन ठाणे (Thane) येथे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. या नागरिकाच्या मृत्यूमुळे ठाणे परिमंडळात आतापर्यंत स्वाईन फ्यूची लागन होऊन झालेल्या मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. ठाणे आरोग्य विभागातील स्थानिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ठाणे परिमंडळामध्ये ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांचा समावेश आहे.
स्वाईन फ्लूची लागन होऊन मृत्यू झालेल्या चौघांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. दोन्ही महिला ठाणे शहरातील कोपरी परिसरात राहणाऱ्या आहेत. तर 49 वर्षीय एक नागरीक ठाण्यातीलच काजूवाडी परिसररातील आहे. तो 28 जुलै रोजी मृत्यू झाला. शेवटची अपडेट हातील आली तेव्हा मृत्यू झालेला ज्येष्ठ व्यक्ती अंबरनाथ येथील रहिवासी आहे.
ठाणे परिमंडलातील आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, स्वाईनफ्लू मुळे मृत्यू झालेल्या ठाण्यातील मृतांची संख्या 138 इतकी झाली आहे. प्रशासन आवश्यक पावले टाकत आहे. प्रशासनाने नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचेही अवाहन केले आहे.