Kalyan News: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि इतर तिघांनी एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये घुसून 35.8 लाख रुपये किमतीचे सोने आणि रोख लंपास केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. शुक्रवारच्या रात्री चौघांनी मिळून या घरातील चोरी केली, पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. कल्याणमधील चिकनघर परिसरात गरबा कार्यक्रमासाठी रहिवासी बाहेर गेले होते. त्यावेळी वॉचमनने त्याच्या पत्नीसह दोघांबरोबर चोरी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरी कोणी नसताना घराचा दरवाजा तोडून चौघांनी चोरी केली. पोलिसांनी या घटनेसाठी कलम 457 (घर तोडणे), 380 (चोरी) आणि भारतीय दंड संहितेच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर वॉचमनने शिडीचा वापर करून खिडकीचा दरवाजा तोडून आत शिरले. आरोपींनी बेडरूममधील लॉकर स्क्रू ड्रायव्हर आणि कटरने फोडले आणि 35.88 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.कपाटातील सर्व साहित्य घेवून फरार झाले. या घटनेची माहिती पोलिसांत देण्यात आली. पोलीसांनी रात्रीचं घटनास्थळी येवून शोध सुरु केला.
वॉचमन गगन बहादूर (48), त्यांची पत्नी सुमन (46) आणि दोन अज्ञात व्यक्तींनी फ्लॅट फोडला, अशी माहिती पोलिसांनी दिली.पोलीसांनी सर्व चोरी केलेले मौल्यवान दागिने जप्त केले आहे.