Overturns Truck On Ghodbunder PC twitter

Thane Accident News: ठाण्यातील पाटलीपाडा परिसरात खाद्य पदार्थ वाहून नेणारा ट्रक पलटी झाला आहे. ठाण्यातील घोडबंदर पुलावर सोमवारी पहाटे 1.30 हा ट्रक पलटी झाला. या घटनेमुळे रस्त्यावर दोन तास वाहतुक कोंडी झाली होती. अशी माहिती ठाण्याच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या (आरडीएमसी) अधिकाऱ्याने दिली. ठाण्यातील घोडबंदर रोड येथील पाटलीपाडा पुलावर खाद्यपदार्थ घेऊन जाणारा कंटेनर उलटला. ही  माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक,  चितळसर पोलीस कर्मचारी, कासारवडवली वाहतूक पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी दोन क्रेन मशीन, दोन पिकअप वाहने आणि एक अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहोचले. दोन तासानंतर रस्ता सुरळीत चालू झाला.