अग्निशमन सुरक्षेच्या(Fire Safety) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ठाण्यातील (Thane)70 रुग्णालयांना टाळे ठोकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याची मुदत संपताच त्याच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेने 15 रुग्णालये सील करण्यात केली आहेत. ठाणे महापालिकेने कायद्याचे उल्लंघन केलेल्या रुग्णालयांना 48 तासांची मुदत दिली होती. ह्या कारवाईमुळे आता अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या इतर रुग्णालयांचेही धाबे दणाणले आहेत.
ठाण्यात अनेक रुग्णालये( Hospitals) ही आगप्रतिबंधात्मक उपाययोजनांविना चालवली जात असल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अशा रुग्णालयांची माहिती मागितल्यानंतर आगप्रतिबंधात्मक प्रमाणपत्र नसलेली 120 रुग्णालये आढळून आली. ह्यात जी 20 ते 25 रुग्णालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, त्याच रुग्णालयांवर कारवाई होईल, अशी शक्यता वाटत होती. मात्र आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने संबंधित रुग्णांवर धडक कारवाई सुरु केली आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 15 रुग्णालये सील करण्यात आली आहेत. ह्या कारवाईत ठाण्यातील वागळे इस्टेटमधील 5, बाळकुम येथील 3, नौपाडा येथील 3 आणि मुंब्रा-कळवा परिसरातील 4 रुग्णालयांचा समावेश आहे.
त्याचबरोबर अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या इतर रुग्णालयांनाही नोटीसा पाठविण्यात आल्या असून, आवश्यक बदल करणा-या रुग्णालयांना प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येतय. मात्र अग्निशमन सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या रुग्णालयांवर अधिक कडक कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी ठाणेकर करू लागले आहेत.