Representational Image (Photo Credits: PTI)

आज, 18 ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिका (TMC) व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 30व्या 'ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन' (Thane Mayor Varsha Marathon) आयोजित करण्यात आले होते. राज्यातील धावपटूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मॅरेथॉन पार पडली. या 21 कि.मी. स्पर्धेत आबालवृद्धांच्या चुरशीच्या शर्यतीत सरतेशेवटी झारखंडचा (Jharkhand) पिंटू यादव (Pintu Yadav) प्रथम आला होता, मात्र स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र घोषित करून करणसिंग भीसाराम याला विजयी घोषित करण्यात आले. यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. (बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना खेलरत्न तर रवींद्र जडेजा याची अर्जुन पुरस्कारासाठी निवड)

याप्रकरणी जिल्हा संघटनेचे अशोक आहेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा राजयपूर्ती मर्यादित असल्याने झारखंडचा पिंटू हा स्पर्धेसाठी दप्तर असल्याने त्याला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. वास्तविक जेव्हा मॅरॅथॉनसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु होती, तेव्हा पिंटूने दिलेल्या माहितीनुसार तो नाशिकचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र निकालानंतर विजयी स्पर्धकांची कागदपत्रे तपासताना पिंटुकडे काहीच पुरावा नव्हता. यामुळे त्याला अपात्र ठरवून दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या करणसिंग भीसाराम याला विजयी घोषित करण्यात आले. तर महिलांमधून आरती पाटील विजयी ठरली. या प्रकरणी ठाणे अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनद्वारे ऑल इंडिया अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनकडे कळवण्यात येणार आहे,

दरम्यान, आजच्या स्पर्धेवेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सहभागी धावपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते. यंदा स्पर्धेपूर्वी महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेतर्फे मॅरेथॉन रद्द करून ती रक्कम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतकार्यात देण्याची मागणी करण्यात आली होती.