एकनाथ शिंदे (Photo Credit: Facebook)

मुंबई पाठोपाठ कोरोनाचा प्रसार (Coronavirus) झालेल्या उपनगरांमध्ये ठाणे (Thane) शहराचे नाव अग्रेसर आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी येत्या तीन आठवड्यात 1000 बेडचे रुग्णालय उभारण्याचे आदेश राज्याचे नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी दिले आहेत. यानुसार ठाणे महानगरपालिकेकडून ठाण्यातील ग्लोबल इम्पॅक्ट हबचे (Global Impact Hub) या तात्पुरत्या रुग्णालयात रूपांतर करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे रेड, ग्रीन आणि ऑरेंज अशा तीन झोन मध्ये विभाजन करण्यात आले आहे. यानुसार, ठाण्यात अधिक कोरोना रुग्ण असल्याने ठाणे जिल्हा हा रेड झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. याशिवाय तुम्ही राहात असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो जे जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

प्राप्त माहितीनुसार ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 1238 रुग्ण आढळले आहेत तर यातील 21 जणांचा आजवर मृत्यू झाला आहे, 285 जणांना कोरोनावर मात करता आली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.\

पहा ट्विट

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात काही परिसर हे कंटेनमेंट झोन तसेच हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत, या भागात पूर्णतः संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. ठाण्यातील अनेक सेवाभावी संस्थांनी भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरोघरी करण्यास सुरुवात केली आहे, सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळत कोरोनावर मात करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे.