
ठाणे (Thane) येथील कॅसल ब्रिजवरुन खाली पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अद्याप दुचाकीस्वाराची ओळख पटली नसून पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत.
दुचाकीस्वार ब्रिजवरुन कशामुळे कोसळला याबद्दल शोध घेतला जात आहे. तसेच खाली पडताना त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते की नाही हा सुद्धा प्रश्न विचारला जात आहे.(नाशिक: लग्न करण्यासाठी 38 वर्षीय व्यक्तीकडून ब्लॅकमेल, नदीत उडी टाकत 20 वर्षीय तरुणीची आत्महत्या)
तर पोलिसांकडून या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. त्याचसोबत अपघातावेळी तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे.