Fake love (Photo credit- pixabay)

Thane Crime: ठाण्यातील एका  प्रियसीने चार सहकार्यांसोबत प्रियकराला मारलं आणि नग्नवस्थेत रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे. ठाणे पोलीसांनी या संदर्भात दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलीसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. भाविका भोईर आणि नदीम खान असे दोन आरोपांची नावे समोर आले आहे. बालाजी शिवभगत असे या पीडित व्यक्तीचे नाव आहे. दोघेही शहापूर इथले रहिवासी आहेत.

भाविका गेल्या अनेक वर्षांपासून पीडित व्यक्तीच्या प्रेमसंबंधात राहत होती. आपलं नातं टिकून राहावं या करिता पीडित व्यक्ती नेहमी भाविकाला भेटवस्तू देत राहीला.  28 जूनच्या सांयकाळी भाविकाने  शिवभगतला शहापुरच्या एका ठिकाणी बोलवलं होतं. त्याच्यां भेटी दरम्यान भाविकांचे चार मित्र त्या ठिकाणी आले आणि त्या पीडित व्यक्तीला मारहाण केली. त्याच्या डोक्यावर मार लागल्यामुळे त्याला गंभीर जखमा झाल्या. दुसऱ्या दिवसी त्यासा नग्मवस्थेत शहापुर परिसरातील रस्तावर फेकल.

पीडित व्यक्ती पोलीसांची तात्काळ मदतीला धावला आणि पोलीसां त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने सर्व हकीकत सांगितली. भाविका दुसऱ्या मुलाच्या प्रेमात पडली असताना तीन माझ्यावर अत्याचार केला, माझ्याकडून पैसे लुटलं.  आरोपींनी पीडीताकडून दोन सोन्याच्या चैनी, आणि अंगठ्या जबरदस्तीने काढून घेतले आणि कपडे काढून व्हिडिओ शूट केला. या घटनेत तीनं माझ्या कडून लाख रुपये लुटल्याचे सांगितले.