Thane shocker: डोंबिवलीत वडिलांनीच आपल्या मतिमंद मुलीचा गळा दाबून केला खून, आरोपी व्यक्तीला अटक
arrest

Thane shocker: ठाण्यात एका वडिलांनी 10 वर्षाच्या मतिमंद मुलीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीची हत्या केल्या प्रकरणी ठाणे पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. एक पोलिस अधिकाऱ्यांने सांगितल्या प्रमाणे या जोडप्याला 5 ते 14 वयोगटातील चार मुली आहे. आणि त्यातील सर्वात लहान मुलगी ही तिच्या आजी आजोबांसोबत गावी राहते. आरोपी मनोज अग्रहरीने डोंबिवलीतील राहत्या घरी हे कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोजने दारू पिऊन मुलीचा गळा आवळून तीचा जीव घेतला. मनोज हा दारू पिऊन पत्नीला मारहाण करायचा. आरोपी किराणा दुकानात काम करायचा आणि त्याची पत्नी ही देखी कुटूंबासाठी कंपनीत काम करायची. या दोघांची १० वर्षांची मुलगी होतील. लवलीना असं मृत मुलीचे नाव होते. घरी कोणी नसताना दारू पिऊन त्यांने मुलीचा गळा दाबला. यात तीला श्वासशोच्छवासाला त्रास झाला. आणि तीनं जागीच जीव सोडला.

मुलगी जन्मताच मतिमंद होती. तीला मानसिकदृष्टा काही आजार होता. तीचा गळा दाबून खून केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बाहेर मोठी मुलगी घरी आल्यावर तीला लवलीनाचा मृतदेह बेड दिसला. हा सर्व प्रकार तीनं पोलीसांत सांगितला. पोलीसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीला देखील कायदेशीर अटक केली आहे.