ठाणे कोर्टाने (Thane Court) आज 30 वर्षीय एका भाजी विक्रेत्याला त्याच्या पत्नीची निर्घुण करत पुरावे नष्ट केल्याच्या गुन्ह्याखाली शिक्षा ठोठावली आहे. कोर्टाने आरोपीला जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे. हसीम मंडल असं आरोपीचं नाव असून कोर्टाने त्याला 5 हजारांचा दंड देखील सुनावला आहे. दरम्यान आरोपी कलम 302, 201 अंतर्गत दोषी ठरला आहे.
हसीम चं त्याची पत्नी रेहाना सोबत लव्ह मॅरेज झाले होते. ते दोघेही शिरवणे गावात राहत होते. आरोपीला पत्ते खेळण्याचा आणि मद्य सेवनाचा नाद होता. घरी आल्यानंतर अनेकदा तो पत्नीला मारहाण करत असे. अनेकदा रेहाना आपल्या भावाच्या घरी जात असे. पण हसीम चूक झाल्याचं सांगत तिला पुन्हा घरी घेऊन येण्यामध्ये अयशस्वी ठरत असल्याचं वकील Rekha Hiwarale यांनी सांगितल्याचं टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तामध्ये सांगितले आहे.
21 एप्रिल 2011 दिवशी पीडीत रेहाना शेवटची तिच्या भावाच्या घरातून शिरवणे येथील त्यांच्या घरी परतली होती. त्यानंतर 23 एप्रिलला तिचा मृतदेह आढळला. घर देखील बंद करून आरोपी पळून गेला होता. घरातून दुर्गंध येण्यास सुरूवात झाल्यानंतर शेजारच्यांनी पोलिसांना कळवलं.
23 मार्च 2020 दिवशी निकाल जाहीर होणार होता पण आरोपी फरार असल्याने आणि कोविड संकटामुळे ही प्रक्रिया लांबली होती. आरोपी आज पर्यंत कोर्टात सादर होऊ शकलेला नाही. अखेर 30 नोव्हेंबर 2021 ला जाहीर झाला आहे. कोर्टाने आरोपी विरोधात कन्विक्शन वॉरंट जारी करण्यात आले आहे. संबंधित पोलिस स्थानकामध्ये आरोपी विरूद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.