ठाणे: बांगरवाडी मधील शाळकरी मुलांचा जीवघेणा संघर्ष, शाळेत जाण्यासाठी गुडघाभर पाण्यातून मार्ग
Thane Bangarwadi Water Logging (Phorto Credits: ANI)

राज्यात पावसाच्या सरींनी थैमान घातल्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. कुठे खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तर कुठे विजेच्या धक्क्याने अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले होते, याच पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या जीवाची काळजी करत राज्य सरकारने अतिवृष्टीच्या दिवशी राज्यातील शाळा कॉलेजांना सुट्टी जाहीर केली होती, मात्र ठाणे (Thane) येथील बांगरवाडी (Bangarwadi) परिसरातील शाळकरी मुलांसाठी साचलेल्या पाण्याचा त्रास सहन करणे हा नित्यक्रमच बनला आहे. मुरबाड (Murbad) तालुक्यातील बांगरवाडी परिसरात मूलभूत सुविधांच्या अभावी विद्यार्थ्यांना रोज 3  किलोमीटर पायपीट करत शाळा गाठावी लागते, यासाठीही केवळ एकच चिंचोळा रस्ता उपलब्ध आहे, पावसाळयात या रस्त्याची अशी काही दुर्दशा होते की विद्यार्थ्यांना गुडघाभर साचलेल्या पाण्यातून दप्तर डोक्यावर घेऊन चालण्याशिवाय पर्याय उरात नाही.

ANI ट्विट

बांगरवाडी हे कल्याण आणि मुरबाड तालुक्याच्या वेशीवरील छोटेसे गाव आहे. या गावात आदिवासी जमातीची जेमतेम 200 लोकांची वस्ती आहे. याच गावाला जाणाऱ्या एकमेव रस्त्याची ही अवस्था दयनीय आहे. कुंदे गावापासून बांगरवाडी गावाला जायला एक कच्चा रस्ता आहे. दुसऱ्या गावात किंवा शहरात, तालुक्याला जायचं असेल, तर याच रस्त्यावरुन गावातले आबालवृद्ध, विद्यार्थी, महिला यांना रोजचा प्रवास करावा लागतो. या एकमेव रस्त्याची डागडुजी करून निदान पावसाळ्यात तरी मदत व्हावी यासाठी नागरिकांनी प्रशासनाला विनंती केली होती मात्र ग्रामपंचायती कडून हा रस्ता खाजगी मालकीचा असल्याचे सांगितले जाते. रत्नागिरी: खेड, चिपळूण, दापोलीत पावसाचा हाहाकार; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प

दरम्यान ठाणे तहसीलदार ऑफिसतर्फे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार,विद्यार्थ्यंच्या त्रासाबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले जातेय, शिवाय, पावसामुळे ही अवस्था ओढवली असल्याचे म्हणत रहिवाश्याना मदतीसाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास दर्शवला जात आहे