Photo Credit: X

ठाण्यामध्ये 10 मजली रहिवासी इमारती मध्ये ventilation duct वर पडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना मुंब्रा च्या समता नगर मधील Shraddha Prati building मधील आहे. सोमवार 7 एप्रिल दिवशी सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी याबाबत Thane Municipal Corporation's disaster management cell कडे माहिती आल्याचे सांगण्यात आले आहे.

मृत मुलगी या इमारतीमधील रहिवासी नव्हती. मात्र धावता धावता ती vertical duct वर पडली. ही चिमुकली इमारती मध्ये कशी आली? याचा तपास सध्या सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

इमारतीतील रहिवासी एक मोठा आवाज झाल्याने गडबडले. त्यानंतर काही लोकांनी मुलीला व्हेंटिलेशन शाफ्टच्या पायथ्याशी कोसळलेले पाहिले. मुंब्रा पोलिस स्टेशनचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे पथक, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि खाजगी रुग्णवाहिका यासह आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.

खांबाच्या अरुंद रचनेमुळे बचाव कार्य कठीण असूनही, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी मुलीला बाहेर काढले. त्यानंतर तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. सध्या तिचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला आहे.

मुलीने धोकादायक शाफ्टमध्ये कसा प्रवेश केला? आणि इमारतीच्या सुरक्षिततेत काही निष्काळजीपणा किंवा त्रुटी होत्या का, याचा तपास सध्या सुरू आहे. नक्की वाचा: Delhi Tragedy: अल्पवयीन चालकाने 2 वर्षांच्या मुलीला कारखाली चिरडले, चिमुकलीचा मृत्यू; दिल्ली येथील पहाडगंज परिसरातील घटना .

"ही एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे. उंच इमारतींमध्ये, विशेषतः जिथे मुले असतात तिथे, अशा उघड्या ventilation ducts च्या सुरक्षिततेचा गांभीर्याने पुनर्विचार केला पाहिजे," असे बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत मुलगी मुंब्रा येथील ठाकूरपाडा येथील मुंब्रादेवी अपार्टमेंटमध्ये राहणारी होती.अधिकाऱ्यांनी पालकांना सतर्क राहण्याचे आणि इमारतींमधील असुरक्षित आणि धोकादायक क्षेत्रांपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले आहे.