Sanjay Raut On BMC Elections 2025: महाविकास आघाडी (MVA) मध्ये सर्व काही ठीक नसल्याचं दिसून येत आहे. कारण, आता शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीत त्यांचा पक्ष एकट्याने उतरेल असे संकेत दिले आहेत. पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकट्याने जाण्याचा आग्रह धरत आहेत. कारण, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लोकसभा किंवा राज्य विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त इच्छुक आहेत.
पक्षाने एकट्याने निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा - संजय राऊत
बीएमसी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. पक्षाने एकट्याने निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अविभाजित शिवसेनेने 1997 ते 2022 अशी सलग 25 वर्षे बीएमसीवर नियंत्रण ठेवले. बीएमसीच्या पूर्वीच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींचा कार्यकाळ मार्च 2022 च्या सुरुवातीला संपला आहे. आता जवळपास तीन वर्षांनी नवीन निवडणुका होणार आहेत. (हेही वाचा -भाजप सत्तेत आल्यापासून मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले, कल्याण ही सुरुवात आहे; Sanjay Raut यांचे खळबळजनक वक्तव्य)
संजय राऊत यांची महायुतीवर टीका -
यांसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुंबईत पक्षाची सत्ता निर्विवाद असल्याचे राऊत म्हणाले. मुंबईत (विधानसभा निवडणुकीच्या वेळी) लढण्यासाठी आम्हाला जास्त जागा मिळाल्या असत्या तर त्या जिंकल्या असत्या. मुंबई जिंकणे आवश्यक आहे अन्यथा हे शहर महाराष्ट्रापासून वेगळे केले जाईल, असा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. (हेही वाचा -Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घराची रेकी, आरोपी हेल्मेट आणि मास्कमध्ये दिसले; एफआयआर दाखल (Watch Video))
ठाकरे गट शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत मुंबईत 24 जागा लढवल्या आणि 10 जिंकल्या, तर काँग्रेसने 10 जागांसाठी उमेदवार उभे केले. त्यातील चार जागावर काँग्रेसला आपला गड राखता आला. तथापी, विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला बहुमत मिळाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.