Sanjay Raut: संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्याच्या बाहेर दोन अज्ञातांकडून रेकी (Rekhi) करण्यात आल्याचे समोर आले आहे. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन अज्ञात व्यक्ती हेल्मेट आणि मास्कसह संजय राऊत यांच्या घराबाहेर रेकी करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकाराबाबत पोलीस चौकशी सुरू आहे. अज्ञात व्याक्तींच्या हातात आठ ते दहा मोबाईल दिसत होते. नेमकी रेकी का करण्यात आली? आरोपींचा उद्देश काय असेल? याचा तपास सुरु आहे.
आरोपी हेल्मेट आणि मास्कमध्ये दिसले
#BREAKING: शिवसेना यूबीटी के नेता और सांसद संजय राउत के बंगले की दो अज्ञात लोगों ने की रेकी. शिकायत मिलने के बाद बंगलो पर मुंबई पुलिस के अधिकारी पहुंचे.#Mumbai pic.twitter.com/2JIhHoEQxu
— NDTV India (@ndtvindia) December 20, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)