महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. नागरिकांना आणखी काही दिवस थंडीचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. उत्तरे कडून वाहणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडची लाट आली असून पुणे येथे 8.2 तर, नाशिक शहरात 6.6 अंश सेल्सिअस तापमानांची नोंद झाली आहे. याशिवाय नाशिक, जळगाव, धुळे आणि मराठवाड्यातही शीत कहर पाहायला मिळाले आहे. तसेच उद्या 18 जानेवारी रोजीदेखील थंडीची लाट कायम राहिल, असे हवामान विभागाने वर्तवले आहे. गेल्या वर्षी पावसाने अधिक मुक्काम केल्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले असावे, असा अंदाज नागरिक लावत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील प्रमुख शहरांमध्ये मागील 24 तासांत झालेली नोंद पुढील प्रमाणे-
मुंबई 14.5, सांताक्रूझ 11.4, अलिबाग 12.9, रत्नागिरी 14.1, डहाणू 14.5, पुणे 8.2, अहमदनगर 9.2, जळगाव 7.0, कोल्हापूर 14. 5, महाबळेश्वर 10.0, मालेगाव 8.2, नाशिक 6.0, सांगली 14.0, सातारा 10.2, सोलापूर 15.7, औरंगाबाद 8.1, परभणी 12.7, नांदेड 11.5, बीड 13.3, अकोला 12.4, अमरावती 14.0, बुलढाणा 11.4, ब्रह्मपुरी 14.0, चंद्रपूर 16.2, चंद्रपूर 16.2, गोंदीया 13.6, नागपूर 15.1, वाशिम 13.6, वर्धा 17.6, यवतमाळ 14.4 असे तापमान नोदवण्यात आले आहे. हे देखील वाचा- मुंबई मध्ये 27 जानेवारीपासून मॉल, उपहारगृह 24x7 सुरू ठेवण्यास परवानगी; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा निर्णय
राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक येथे 6.0 अंश सेल्सिअस असे नोंदवले गेले आहे. त्या खालोखाल पुणे, मालेगाव आणि औरंगाबाद येथे कमी तापमानाची नोंद झाली आहे. या शहरातील नागरिकांना थंडीने हुडहुडी भरली आहे.