मुसळधार पावसामुळेझाली आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही राज्यांतील नद्यांना दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे हैदराबाद आणि विजयवाडासारख्या मोठ्या शहरांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संकटाच्या पार्श्वभूमीवर, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि एन चंद्राबाबू नायडू यांनी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि बचाव कार्यात समन्वय साधण्यासाठी आपत्कालीन बैठका घेतल्या. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती भयानक आहे. येथे 110 गावे पाण्यात बुडाली आहेत. 119 पूरग्रस्त लोक डोंगर आणि इमारतींवर अडकले आहेत आणि बचावाच्या प्रतीक्षेत आहेत. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मधील काही भागात रेड अलर्ट )
केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार म्हणाले की, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना गंभीर परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे, ज्यामध्ये त्यांना लोक अडकलेल्या विशिष्ट ठिकाणांबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे. यानंतर, केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेनुसार, चेन्नई, विशाखापट्टणम आणि आसाममधील नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF) च्या 9 टीम तेलंगणामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. आंध्र प्रदेशातही मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. विजयवाडा शहरात, विशेषत: रामकृष्ण पुरम भागात जोरदार पूर आला आहे, जिथे घरे आणि वाहने पाण्याखाली गेली आहेत. NDRF आणि स्थानिक पोलिस दोन्ही सक्रियपणे बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहेत आणि बाधित रहिवाशांना पुनर्वसन केंद्रात हलवत आहेत.
वृत्तानुसार, मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवांमध्ये लक्षणीय विस्कळीत झाली आहे, परिणामी 99 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. चार गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या असून 54 गाड्या वळवण्यात आल्या आहेत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी तेलंगणा सरकारने सोमवार, 2 सप्टेंबर रोजी हैदराबादमधील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.