कॅन्सर (Photo Credit: Pixabay)

मीरा रोडमधील (Mira Road) रुग्णालयातील डॉक्टरांनी नुकत्याच केलेल्या शस्त्रक्रियेत (Surgery) एका मुलाच्या फुफ्फुसातील (Lung) दात यशस्वीरित्या काढल्यानंतर त्याला नवीन जीवन मिळाले. बोईसर (Boisar) येथील अल्पवयीन मुलाने दात तुटल्याने तो चुकून गिळला होता. नंतर, त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्याच्या पालकांनी त्याला मीरा रोडच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये (Wockhardt Hospital) नेले. जिथे डॉक्टरांना त्याच्या उजव्या फुफ्फुसात दात (Teeth) सापडला. डॉ संगमलाल पाल, ईएनटी सर्जन म्हणाले, रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याचे पालक घाबरले आणि त्यांनी आमच्याशी संपर्क साधला.

आम्ही रेडिओलॉजी चाचणी केली ज्यामध्ये ब्रोन्कसच्या उजव्या बाजूला दात दिसून आला. त्याला ताबडतोब शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले आणि रुग्णाला सामान्य भूल देऊन दात काढण्यात आला. प्रक्रियेनंतर लगेचच वायुमार्ग आणि श्वासोच्छवासाची स्थिती सुधारली. ऑपरेशननंतर, रुग्णाला बालरोग अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. हेही वाचा Crime: हुंड्यात म्हैस न मिळाल्याने पतीचा चढला पारा, रागाच्या भरात पत्नीची हत्या

रूग्णालयाचे बालरोग तज्ज्ञ डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले की, रूग्णाने दात गिळल्यामुळे तो अस्वस्थ होता आणि बोलू, खाऊ किंवा पिऊ शकत नव्हता. प्रक्रियेनंतर त्याच्या पालकांनी दिलासा व्यक्त केला. आता माझा मुलगा मोकळा श्वास घेऊ शकतो. यशस्वी उपचारानंतर त्याला नवीन जीवन मिळाले, असे त्याचे वडील म्हणाले.