दादर रेल्वे स्टेशन फलाटावर अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीस अटक
molestation (FILE PHOTO)

एका 32 वर्षीय नराधमाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Teenage Girl Molestation) केल्याची घटना दादर रेल्वे स्टेशन (Dadar Railway station) फलाटावर घडली. ओमर सिंह (Omhari Singh) असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अल्पवयीन मुलगी 16 वर्षांची असून ती तिच्या मित्रासोबत घरी निघाली असता सोमवारी (15 जानेवारी) हा प्रकार घडला. आरोपी ओमर सिंह यांच्याविरुद्ध पोस्को कायद्याखाली (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एकवर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी आणि तिचा एक मित्र डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकलमधून मुलूंडला निघाले होते. जनरल डब्यातून प्रवास करत असताना अचानक एक व्यक्ती पाठिमागून ओंगळवाणा स्पर्ष करत असल्याचे मुलीच्या लक्षात आले. तिने त्याला झिडकारले पण, तरीही त्याचा प्रयत्न कायम राहिल्याने तिने तिच्यासोबत असलेल्या मित्राकडे त्याची तक्रार केली.

गाडी कुर्ला स्टेशनला आल्यानंतर आरोपी (सिंह) पीडितेला दिसला. त्याने लगेच मित्राला कल्पना दिली. दरम्यान, त्यांनी पोलिसांना कल्पना दिली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.