सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त स्मारकाच्या दर्शनासाठी जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा एकदा बिघाड झाला आहे. उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटना मात्र टळली. परंतु, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सातारा दौऱ्याला उशीर झाला.
सातारा येथील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जाणार होते. मात्र साताऱ्याला निघण्यापूर्वीच हा तांत्रिक बिघाडाचा घोळ लक्षात आला.
मुख्यमंत्र्यासोबत हेलिकॉप्टर घोळ होण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. तर मुख्यमंत्री आणि हेलिकॉप्टर अपघाताच्या घटना सातत्याने घडत असतात. यापूर्वी दोन वर्षात तब्बल सहा वेळा मुख्यमंत्र्यासोबत हेलिकॉप्टरचा अनुचित प्रकार घडला आहे.