Teacher Suicide Attempt in Mumbai: वेतन मिळत नसल्याने शाळा शिक्षकाचा मुंबईतील आमदार निवास इमारतीवर आत्महत्येचा प्रयत्न; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मंत्री, आमदारांची धावपळ, बचावासाठी प्रयत्न
Teacher Suicide Attempt in Mumbai (संग्रहित संपादित प्रतिमा)

सध्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus) काळात राज्य सरकारचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडून गेले आहे. आता वेतन मिळत नसल्याने आकाशवाणी आमदार निवासस्थानी गजानन खैरे नावाच्या शिक्षकाने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीची माहिती मिळतात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस अधिकारी अग्निशमन दलाचे लोक घटना स्थळी दाखल झाले आहेत. तसेच या गोष्टीची माहिती मिळतात, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोलेंकडून त्या शिक्षकाला समजवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मंत्रालयात सर्वपक्षीय बैठक सुरु असतानाच शिक्षकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जोपर्यंत मला वेतन मिळत नाही व याचे याचे लेखी आश्वासन मिळत नाही, याबाबतचा अध्यादेश निघत नाही, तोपर्यंत मी मागे हटणार नाही, असे हे शिक्षक सांगत आहे. उदय सामंत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हे आश्वासन दिले असल्याचे समजत आहे. खैरे यांचा आमदार निवासस्थानच्या चौथ्या मजल्यावरून आत्महत्येचा प्रयत्न सुरु आहे. (हेही वाचा: मराठा आरक्षण मुद्यावर महाविकासआघाडी सरकार गंभीर, आज होऊ शकतो मोठा निर्णय)

पहा व्हिडिओ - 

याआधी राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांना अनुदान द्या व सेवा संरक्षण देण्याच्या मागणीसाठी, शिक्षक नेते गजानन खैरे यांनी अन्नत्याग, पायी दिंडी आंदोलन केले होते. त्यावेळी विनानुदानित शिक्षकांना अनुदान देण्यासाठी शासन अनुकूल असून लवकरच निर्णय घेतला जाईल व यासाठी मी स्वत: पुढाकार घेतला असल्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले होते. याच गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी ते काही दिवसांपासून आमदार निवास येथे राहत होते मात्र त्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने आज त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.