
Fake MHADA Flat Deal: म्हाडाचा फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याच्या नावाखाली एका शिक्षिकेला 26.23 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. कालाचौकी पोलिसांनी शिक्षिकेच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल केला आहे. शाळेतील एका कार्यक्रमात पीडित शिक्षिकेची भेट आरोपीशी झाली, जिथे आरोपीने त्यांना कमी किमतीत म्हाडाचा फ्लॅट मिळवून देईल, असं सांगितलं. पंरतु, 26 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे दिल्यानंतर आरोपीने कोणताही प्लॅट दिला नाही. त्यानंतर पीडित शिक्षिकेने याप्रकरणी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
कालाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विद्या उगले या बोरिवली येथील एका शाळेत शिक्षिका असून त्या कालाचौकी परिसरात राहते. त्यांचे पती, देखील शिक्षक आहेत. शाळेच्या एका कार्यक्रमात शिक्षिकेची ओळख अरविंद चाळेकरशी झाली. चाळेकरने दावा केला की तो म्हाडाच्या मास्टर फाइल प्रक्रियेत काम करतो. चाळेकर यांनी त्यांना आश्वासन दिले की ते काळाचौकी किंवा परळ येथे म्हाडाच्या फ्लॅटची व्यवस्था 55 लाखात करू शकतात.
हळूहळू, तक्रारदाराने गुगल पे आणि चेकद्वारे एकूण 20.47 लाख हस्तांतरित केले. अशा प्रकारे तक्रारदार शिक्षिकेने आरोपीला एकूण 26.23 लाख रुपये दिले. तथापि, त्यांना कोणतेही मालमत्तेचे कागदपत्रे देण्यात आली नाहीत. जेव्हा त्यांनी त्यांचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली तेव्हा दादरमधील एका वकिलाने त्यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी चाळेकर यांच्या वतीने 20.47 लाखांचा चेक दिला आणि तीन महिन्यांची मुदत मागितली.
तथापि, जेव्हा त्यांनी तीन महिन्यांनंतर चेक जमा केला तेव्हा तो बाउन्स झाला. दरम्यान, कालाचौकी पोलिसांनी आरोपी अरविंद चाळेकरविरुद्ध भादंवि कलम 420 (फसवणूक) अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.