Meera Chopra (Photo Credits: Instagram)

कोविड-19 लसींचा (Covid-19 Vaccines) तुटवडा निर्माण झाला असताना एका अभिनेत्री चक्क कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर (Supervisor at Covid Centre) असल्याचे भासवून लस घेतल्याचे समोर आले आहे. मीरा चोप्रा (Meera Chopra) असे या मॉडेल, अभिनेत्रीचे नाव आहे. भाजप आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांनी ट्विट करत या संपूर्ण प्रकार उघडकीस आणला असून याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुपरवायझरचं  खोटं ओळखपत्र दाखवून या अभिनेत्रीने लसीचा पहिला डोस घेतला. त्यामुळे आता ओळखपत्र देणारी संस्थाही अडचणीत आली आहे. दरम्यान, भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी व्हिडिओ शेअर करत याला जबाबदार कोण असा सवाल केला आहे.

व्हिडिओत ते म्हणतात, ठाणे कोविड केअर सेंटर पार्किंग प्लाझा मधून होम साई केअरद्वारे एका अभिनेत्रीला खरंच सुपरवायजर म्हणून नेमलेलं आहे का? या एजन्सीच्या माध्यमातून अशी किती फेक अपॉयमेंट्स झाल्या आहेत, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. ही खरंच सुपरवाजर आहे की लस मिळण्यासाठी फेक आयडी बनवण्यात आला आहे, याची चौकशी करणे गरजेचं आहे. या एजन्सीमार्फत अजून काही फेक अपॉयमेंट्स झाल्या असतील तर आयुक्तांनी लवकरात लवकर समोर आणाव्यात अशी मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे. याच एजन्सीच्या माध्यमातून ग्लोबल हॉस्पिलटमध्ये व्हेंटिलेटरचा मोठा घोळ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याप्रकरणी काही जणांना अटक देखील झाली होती, हे देखील त्यांना सांगितले.

निरंजन डावखरे ट्विट्स:

तसंच दुसऱ्या ट्विटमध्ये डावखरे यांनी लस घेतल्यानंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटोज, फेक आयडी यांचे फोटोज शेअर केले आहेत.

सर्वसामान्यांना लस मिळत नसताना आणि 18-44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण स्थगित असताना अभिनेत्रीने लस घेतल्याचे फोटोज शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठी टीका झाली. त्यानंतर तिने ते फोटोज काढून टाकले.