Taloja Central jail (photo Credits: Youtube)

पनवेल: तळोजा मध्यवर्ती कारागृहात  (Taloja Central Jail) कैद्यांसाठी दरवर्षी राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा देखील ही स्पर्धा कैद्यांच्या मोठ्या सहभागात पार पडली. विशेष म्हणजे या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या कैद्यांनी आपल्या बक्षिसांची रक्कम आपल्यापाशी न ठेवता पुलवामा (Pulwama Martyrs)  हल्य्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना समर्पित करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या वृत्तानुसार रामचंद्र प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कारागृहांमध्ये दरवर्षी निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील सर्व मध्यवर्ती कारागृह विशेष व निवडक 16 कारागृहांमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाते.

राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेचे आयोजन यंदा  7 मे रोजी करण्यात आले होते त्याचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला यामध्ये तीन बक्षीस व पाच उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.  बक्षिसाची रक्कम जरी शुल्लक असली तरी यामागील भावना शुद्ध असल्याने या कैद्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.बक्षीस वितरण सोहळ्यात विजेत्यांची नावं घोषित होताच एका कैद्याने पुढाकार घेऊन आपण आपले बक्षीस हे पुलवामा हल्ल्यातील शहिदांना समर्पित करू इच्छितो अशी घोषणा केली त्यापाठोपाठ सर्वच कैद्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला. तुरुंगातील कैद्यांची चंगळ : जेवणासाठी मिळणार पावभाजी, पुरी, छोले भटुरे, खीर यांसारखे पदार्थ

कैदी हे परिस्थिमुळे अनेकदा गुन्हा करतात पण म्हणून त्यांना भावना नाहीत असा अर्थ होत नाही कैद्यांनी राष्ट्रभक्तिपर निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांचे विचार निबंधातून मांडले. कारागृहातून सजा संपवून बाहेर पडल्यानंतर हे कैदी निश्चितच भारताचे आदर्श नागरिक असतील, असा विश्वास रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.विजयी कैद्यांनी देऊ केलेली रक्कम रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना पाठविण्यात येणार आहे.