Tadoba National Park (Photo Credit: Wikimedia Commons)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्यात सर्व पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. राज्यात 30 जूनपर्यंत ठेवण्यात आलेल्या लॉकडाऊनला गालबोट लागू नये यासाठी राज्य सरकराने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र आता लॉकडाऊन अनलॉकच्या दिशेने सुरु झाले असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari National Park)  1 जुलैपासून पर्यटनासाठी खुले करण्यात येणार आहे. यामुळे राज्य शासनाकडून त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व पर्यटकांचे लॉकडाऊन कधी उठवणार याकडे लक्ष लागले आहे.

ताडोबा अभयारण्या जरी सुरु करण्यात येणार असले तरीही येथे येणा-या पर्यटकांसाठी काही नियम घालण्यात आले आहे. अभयारण्यात येणा-या पर्यटकांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. पर्यटनासाठी येणार्‍या पर्यटकांना स्वतःचा मास्क, सॅनिटायझर वापरावे लागेल. या दोन वस्तू नसल्यास त्या पर्यटकांना जंगल भ्रमंती करता येणार नाही. या सर्वाची योग्य ती खबरदारी घेणे याची जबाबदारी ताडोबा अभयारण्यातील अधिका-यांची आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साइटच्या प्रस्तावित लिलावाला आदित्य ठाकरे यांचा विरोध; वन्यजीव कॉरिडॉरचा असा नाश करू शकत नाही म्हणत केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना लिहलं पत्र

त्याचबरोबर ताडोबाच्या प्रवेशद्वाराजवळ ‘डिजिटल थर्मामिटर’द्वारे पर्यटकांची तपासणी केली जाणार असून, पर्यटकांना तापाचे लक्षणे दिसल्यास त्या पर्यटकास जंगल भ्रमंतीपासून रोखले जाणार आहे. लॉकडाऊन पूर्वी ताडोबा अभयारण्यात येणा-या पर्यटकांना मोबाईलवर बंदी घातली आहे. मोबाईलचा त्रास वन्य प्राण्यांना होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा उत्साहापोटी पर्यटक, गाईड किंवा वाहन चालकांकडून नियमांचे उल्लंघन केले जाते. म्हणून येथील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.