Swachh Rail, Swachh Bharat 2019: केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी काल (2 ऑक्टोबर) महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरातील स्वच्छ रेल्वे स्थानकांची यादी जाहीर केली आहे. यंदा पहिल्यांदाच समाविष्ट करण्यात आलेल्या उपनगर श्रेणी मध्ये मुंबईमधील पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकाने (Andheri Railway Station) अव्वल स्थान पटकावले आहे. तर विरार (Virar) दुसर्या आणि नायगाव (Naigaon) तिसर्या स्थानी आहे. तर देशामध्ये सर्वात स्वच्छ रेल्वे स्थानकाचा मान जयपूर रेल्वे स्थानकाला मिळाला आहे. तर त्यापाठोपाठ जोधपूर आणि दुर्गापूर रेल्वे स्थानक भारतामध्ये स्वच्छ रेल्वे स्थानक आहे.
109 महानगरांमधून स्वच्छ रेल्वे स्टेशनच्या यादीमध्ये अंधेरी स्थानकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर तीन रेल्वे झोनमध्ये उत्तर पश्चिम रेल्वे पहिल्या स्थानी, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि पूर्व मध्य रेल्वे तिसर्या स्थानी आहे. मध्य रेल्वेच्या टॉप 10 मध्ये मुंबईतील 3 स्थानकांचा समावेश आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी BMC चा नवा फंडा ; स्वच्छ परिसर स्पर्धेत विजेत्या नगरसेवकांना देणार 1 कोटीचा पुरस्कार
रेल्वे प्रशासनाकडून 2016 पासून दरवर्षी स्वच्छ रेल्वे स्टेशनची यादी जाहीर केली जाते. देशातून 720 स्थानकांमधून स्वच्छ रेल्वे स्थानकांची निवड केली जाते. स्वच्छतेच्या सर्वेक्षणामध्ये विविध निकषांचा विचार केला जातो. यामध्ये हिरवळ टिकवण्यासाठी काय विशेष प्रयत्न केले जातात यावर लक्ष दिले जाते.