Sushma Andhare Helicopter Crash: सुषमा अंधारेंचे हेलिकॉप्टर क्रॅश, सुषमा अंधारे आणि पायलट सुखरुप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घ्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. महाडमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. सुषमा अंधारेच्या बसण्यापूर्वीच हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.  सकाळी 9.30 वाजता सुषमा अंधारे   बारामतीच्या दिशेने जाणर होत्या.   बारामतीला जाण्यासाठी त्या हेलिपॅडवर पोहचल्या.  हेलिकॉप्टरचा अपघात सुषमा अंधारे यांच्या समोरच झाला आहे. या अपघातात हेलिकॉप्टरचे तुकडे झाले. स्थानिकांच्या मदतीने पायलटला बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा - Anil Navgane Attack: रायगड जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर दगडफेक, विकास गोगावले यांच्यासहित 25 जणांवर गुन्हा दाखल)

अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामध्ये हेलिकॉप्टरचे मोठे नुकसान झाले आहे. सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते. पण हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली. माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली आहे.

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर लँड होत होते. तेव्हा अचानक हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. धुळीचे लोट उडाल्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये दिसत आहे की, पायलट हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचवेळी अचानक मोठा आवाज होतो आणि हेलिकॉप्टर कोसळते.