Purvashi Raut Engagement Ceremony (Photo Credits: Twitter)

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची कन्या पूर्वशी राऊत (Purvashi Raut) हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे सुपूत्र मल्हार नार्वेकर (Malhar Narvekar) यांच्याशी साखरपुडा संपन्न झाला. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी संजय राऊत यांचे संपूर्ण कुटूंब आणि काही दिग्गज नेते मंडळी उपस्थितीत होती. या सोहळ्याचे फोटोज राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पतीसह या साखरपुड्यास हजेरी लावली होती. सुप्रिया सुळे यांनी पूर्वशी आणि मल्हार या दोघांना शुभेच्छा देत ट्विटरवर या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोज शेअर केले आहेत.हेदखील वाचा- Purvashi Raut Engagement Ceremony: संजय राऊत यांच्या कन्येचा साखरपुडा; ठाकरे, पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र, देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित

संजय राऊत यांचे व्याही हे ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आहे. राजेश नार्वेकर हे अभ्यासू आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी याआधी रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काम केले आहे. तसंच 2018 मध्ये मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून सुद्धा काम पाहिले होते.

तसेच आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्यातील प्रमुख राजकीय नेते या साखरपुड्याला हजेरी लावणार आहे. तसेच या साखरपुडा सोहळ्यासाठी महाविकास आघाडीचे अनेक नेते हजर राहणार आहेत.