Nashik Suicide Case: नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या; वडील आणि दोन मुलांनी गळफास लावून संपवली जीवनयात्रा
Suicide | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Nashik Suicide Case: नाशिकमधून (Nashik) अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी राहत्या घरात आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येची कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोक नगर भागात एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. या कुटुंबातील तिघांनी राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. दीपक शिरोडे, वडील (वय 55), मोठा मुलगा प्रसाद शिरोडे (वय 25), राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या करणाऱ्यांची नावे आहेत. (हेही वाचा - Shubhangi Jogdand Murder Case: शुभांगी खून प्रकरणातील महत्त्वाचे अपडेट आले समोर; पोलिसांना नाल्यात सापडली हाडे, तपास सुरू)

या सर्वांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी दुपारी 3 ते साडेतीन च्या दरम्यान घरात कोणी नसताना या सर्वांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान, दीपक शिरोडे हे अशोक नगर बस स्टॉप जवळ फळ विक्रीचा व्यवसाय करतात. पत्नी आणि आई दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यावेळी या तिघांनी आत्महत्या केली. अद्याप आत्महत्येमागे नेमकं काय कारण समोर आलेलं नाही.