सातारा पोटनिवडणूकीत उदयन राजे भोसले यांच्या विरूद्ध निवडून आलेल्या श्रीनिवास पाटील यांनी घेतली लोकसभा सदस्यत्त्वाची शपथ
Shriniwas Patil | (Photo Credit: Archived, edited, representative images)

सातारा लोकसभा मतदारसंघातून (Satara Loksabha Constituency) घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत (Satara By Poll Elections) उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले होते. पाटील यांनी उदयन राजे यांचा 9 हजारहून अधिक मताने पराभव करत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्ह्णून ज्ञात असणारा सातारा मतदारसंघ पुन्हा टिकवून ठेवला होता. निवडून आल्यानंतर आज, 18 नोव्हेंबर रोजी श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली आहे. आजपासून सुरु झालेल्या हिवाळी अधिवशेनाच्या (Winter Session 2019) सुरुवातीला पाटील यांचा शपथविधी पडला .

श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीचे आणि शरद पवार यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी आहेत. तर, उदयन राजे भोसले हे शिछत्रपतींचे वारस असल्याने त्यांचा ही सातारा मतदारसंघात बराच दबदबा आहे. यंदा लोकसभा निवडणूक 2019 मधून उदयनराजे हे खासदार म्हणून निवडून आले होत मात्र अवघ्या तीन महिन्यातच विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी भाजपात प्रवेश घेत सातारकरांना आणि परिणामी राष्ट्रवादी पक्षाला मोठा धक्का दिला होता. (उदयनराजे भोसले यांना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांचा राजकीय प्रवास घ्या जाणून; सनदी अधिकारी ते राज्यपाल मार्गे पुन्हा खासदार)

उदयन राजेंच्या राजीनाम्याने रिकामी झालेली सातारा लोकसभेची जागा भरण्यासाठी विधानसभेच्या सोबतच लोकसभेची देखील पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी भाजपाच्या तिकिटावर उदयनराजे आणि राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील असे मातब्बर उमेदवार रिंगणात असताना सातारकरांनी आपला कौल देत पाटील यांच्या गळ्यात विजयीमाला घातली. यापूर्वी देखील 1999 साली श्रीनिवास पाटील यांनीच उदयनराजे यांना निवडणुकीत धूळ चारली होती.

दरम्यान, आजपासून लोकसभेचे हिवाळी अधिवशेन सुरु झाले आहे. महाराष्ट्र व हरियाणा मधील विधानसभा निवडणुकीच्या नंतर पहिल्यांदाच विकेंद्रीय अधिवेशन होत आहे. यावेळी महाराष्ट्रात सुरु असणारा सत्तासंघर्ष , शिवसेना - भाजप महायुतीतील फूट यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मिळालेली तगडी बाजू या सर्वांचा प्रभाव चर्चेवर दिसून येऊ शकतो.