How To Get 10 Rupees Thali? शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची महाविकासआघाडी अखेर त्यांची 10 रुपयात थाळी ही स्कीम लवकरच सुरु करणार आहे. त्यासंदर्भात महाविकासआघाडी सरकारने 2 जानेवारी रोजी राष्ट्रीय माहिती केंद्राला एक फेस रेकग्निशन सॉफ्टवेअर तयार करण्यास सांगितले आहे. या सॉफ्टवेअरमुळे ही थाळी नक्की कोण घेतं याची माहिती मिळू शकणार आहे. एनआयसी हे इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत संलग्न कार्यालय आहे जे आयटी सेवा वितरीत करण्यात मदतीसाठी पायाभूत सुविधा पुरवते. ही 10 रुपयांची थाळी 15 ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही सरकारने म्हटले आहे. मुंबईमध्ये केईएम, नायर आणि कूपरसारख्या सार्वजनिक रुग्णालयांचा यात समावेश असणार आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी ही योजना “गरीब” नागरिकांसाठी सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, या योजनेंतर्गत नक्की गरीब कोण समजले जाईल हे अद्याप सरकारने निश्चित केलेले नाही.
ही योजना सुरु होताच, पहिल्या तीन महिन्यांपर्यंत, कोणीही त्यांचा चेहऱ्याचा फोटो काढल्यानंतर व आधार तपशील दिल्यानंतर 10 रुपयात जेवणाची थाळी खरेदी करू शकते. परंतु, आधार कार्ड या हेतूने बनवण्यात आले होते की त्यात त्या व्यक्तीची संपूर्ण बायोमेट्रिक माहिती समाविष्ट करता येईल. मग तसे असताना, चेहरा ओळखणारे सॉफ्टवेअर का आवश्यक आहे हे अद्याप कळलेलं नाही.
मुंबई मिरर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या (पीडीएस) अधिका-याने सांगितले आहे की, “आम्ही एनआयसीला चेहरा ओळखणारे सॉफ्टवेअर तयार करण्याची विनंती केली आहे, "हे सॉफ्टवेअर लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडले जाईल. त्यामुळे जो कोणी या योजनेचा लाभ घेईल त्याची नोंद केली जाणार आहे."
मुंबई मध्ये नाईट लाईफ सुरु होणार का? महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतला जाणार निर्णय
दरम्यान, सार्वजनिक वितरण व पुरवठा मंत्री (पीडीएस) छगन भुजबळ यांनी सांगितल्यानुसार ही योजना 26 जानेवारीपासून सुरु करण्यात येणार आहे.