Student Suicide due to Online Shopping Fraud: लोकांना कमी वेळात आणि झटपट अशा मार्गाने खरेदी करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध कंपन्या आपल्या वस्तूंची विक्री ई-कॉमर्स वेबसाइटवर करतात. परंतु अलीकडल्या काळात ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना ग्राहकांच्या फसवणूक झाल्याच्या तक्रारी आणि घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्रातील चंद्रपूर येथे एका विद्यार्थ्याने ऑनलाईन पद्धतीने फोन खरेदी केला. मात्र त्याची फसवणूक झाल्याने चक्क आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या मुलाचे वय 18 वर्ष असल्याचे सांगण्यात येत असून तो बारावी इयत्तेचे सध्या शिक्षण घेत होता.(पुणे: नवरा-बायकोच्या वादानंतर 2 महिन्याच्या बाळाला दिलं रस्त्यावर फेकून; पोलिसांकडून आई-वडिलांवर गुन्हा दाखल)
रोहित असे मुलाचे नाव असून त्याने ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करता यावा यासाठी ऑनलाईन मार्गाने फोन खरेदी केला. मात्र त्याची फसवणूक झाल्याचा प्रकारामुळे त्याला नैराश्य आले होते. याच कारणास्तव ऐवढे मोठे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा रोहित याच्या वडिलांनी म्हटले आहे. फोनसाठी रोहित याने ऑनलाईन पद्धतीने 10 हजार रुपये भरले होते. राहिलेली रक्कम पार्सल आल्यानंतर द्यायची होती. तर पार्सल आल्यानंतर त्याला ते घेण्यासाठी बोलावण्यात आले. पण 5 हजार रुपये कमी पडत असल्याने त्याच्या आईने कुठूनतरी पैशांची जुळवाजुळव केली. परंतु पार्सल उघडून पाहिले असता त्याला त्यामध्ये फोन ऐवजी पाकिट, बेल्ट अशा वस्तू दिसून आल्या. फसवणुक झाल्याने मुलाने कंपनीला फोन सुद्धा लावला पण त्यांचा फोन लागलाच नाही.(Ambernath: मनसे विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्यावर तलवार हल्ला)
फसवणूकीच्या घटनेमुळे नैराश्य येण्यासह आर्थिक चणचण आधीच भासत असलेल्या आई-वडिलांना वाईट वाटले. याच कारणास्तव त्याला दु:ख होत तो कालपासून घरातून गायब झाला होता. घरी परत न आल्याने त्याची मित्रपरिवार आणि आजूबाजूंच्या मंडळींकडे विचारपूस करण्यास सुरुवात केली. अखेर आज सकाळच्या वेळेस त्याचा विहरीत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे रोहितच्या परिवाराला धक्का बसला आहे.