Lockdown In Satara: साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन, 'हे' आहेत नवीन नियम
Lockdown | (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत घट होताना असताना साताऱ्यातील नागरिकांना चिंतेत टाकणारी माहिती समोर आली आहे. सातऱ्यातील (Covid-19 Cases In Satara) कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. सातऱ्यात गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आज 700 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. सातऱ्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट वाढल्याने जिल्ह्याच्या चौथ्या स्तरात समावेश झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

सातऱ्यातील कोरोना रुग्णांची सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्याचा चौथ्या टप्प्यात समावेश झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यात नवे नियम लागू केले जाणार आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळता सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत बाजारपेठ सुरु ठेवण्यात येणार आहेत. तर, शनिवार आणि रविवार पूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेश काढून ही माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात आज 8753 नव्या रुग्णांची नोंद, 156 मृत्यू

ट्वीट-

सातारा जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तब्बल 789 नवे रुग्ण आढळले असून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 94 हजार 640 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 4666 जणांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे. तर 7774 ऍक्टिव्ह रुग्ण सध्या सातारा जिल्ह्यात आहेत.

सातारा, सांगली आणि कोल्हापूरमध्ये मे महिन्यात नवेनवे उच्चांक प्रस्थापित केले होते. त्यानंतर कोरोना रुग्णांचा आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, आता पुन्हा येथील रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.