सामाजिक न्याय ममत्री धनंजय मुंडे यांनी सफाई कामगारांसाठी अत्यंत महत्वाची घोषणा केली आहे. मुंबईत काम करणा-या सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटूंबियांसाठी 16,000 घरे उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे. या घोषणेनंतर सफाई कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मुंडे बोलत होते.
सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांबाबत घेण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक मंत्री धनंजय मुंडे समोर कामगारांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. यावर योग्य तो तोडगा काढण्याचा आमचा प्रयत्न असेल असे धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच तसेच लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतच्या विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल,” असं मुंडे यांनी बैठकीत सांगितलं.
पाहा ट्विट:
सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी 16 हजार घरे मुंबईत उपलब्ध करुन देणार. लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सर्व सफाई कामगारांना लाभ देण्याबाबतीत मुख्यमंत्री महोदयांबरोबर लवकरच बैठक घेण्यात येईल- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री @dhananjay_munde यांची माहिती. pic.twitter.com/VyudOkfOxU
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 22, 2020
हेदेखील वाचा- मुंबई 24x7 ला राज्य मंत्रिमंडळाची मंंजुरी; 27 जानेवारीपासून शहरात 'नाईट लाईफ' सुरू
या बैठकीत सर्वात महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती मुंबईकरांसाठी त्याच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस राबून मुंबई स्वच्छ ठेवणा-या सफाई कामगारांना पक्की घरे देणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी, सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.