Ganapati Ustav 2023: राज्य सरकारने गणेश मुर्तीं संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. या आधी पीओपीच्या मुर्तींवर बंदी घालण्यात आली होती. परंतू या संदर्भात मोठा निर्णय घेत गणेश मंडळांना खुशखबर दिली आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसरच्या गणेशमूर्तींना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत नाही, तोपर्यंत पीओपीच्या मूर्ती असाव्यात, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने बुधवारी मुंबई महापालिकेकडे केली आहे.त्याचसोबत गणेश मूर्तींच्या उंचीवरील मर्यादा काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारने दिली आहे.
गणेश उत्सव साजरा करताना गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणींवर लक्ष ठेवत राज्य सरकारने आंनदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली होती. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. पीओपीमधील घातक घटक बाजूला करून मूर्ती कशा तयार करता येतील, याबाबत शास्त्रकज्ञांची समिती नियुक्ती केली जाईल. या समितीचा अहवाल येईपर्यंत व पीओपीला सक्षम पर्याय मिळत नाही तोपर्यंत गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांच्या मूर्ती पोओपीच्या राहतील.
तसेच, मूर्तींच्या उंचीची मर्यादाही काढून टाकावी, या मंडळांच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत मान्यता दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, अशी माहिती समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड नरेश दहिबावकर यांनी दिली.