MSRTC Bus प्रतिकात्मक प्रतिमा | (File Image)

Maharashtra Suspends State Bus Services to Karnataka: शनिवारी एमएसआरटीसी बसवर (MSRTC Bus) हल्ला झाल्यानंतर कर्नाटकला जाणाऱ्या राज्य परिवहन बस सेवा बंद करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी आदेश दिले आहेत. प्रताप सरनाईक यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही निषेध करतो.'

परिवहन मंत्र्यांनी पुढे म्हटलं आहे की, प्रवासी व आमच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात याव्यात असे निर्देश एस. टी. महामंडळास दिले आहे. कर्नाटक शासन या संदर्भात स्पष्ट भूमिका घेऊन जोपर्यंत आपल्या शासनाची चर्चा करत नाही, तोपर्यंत त्या भागातील महाराष्ट्राच्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्याचही सरनाईक यांनी नमूद केलं आहे. (वाचा - MSRTC Bus Catches Fire in Dharashiv: धाराशिवमध्ये एमएसआरटीसी बसला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी मारल्या खिडक्यांवरून उड्या, पहा व्हिडिओ)

प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द - 

कर्नाटकला जाणाऱ्या बस सेवा बंद -

परिवहन मंत्र्याच्या आदेशानंतर कर्नाटकला जाणाऱ्या सर्व बस सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दररोज महाराष्ट्रातून कर्नाटकला 50 हून अधिक सरकारी बसेस जातात. परंतु, आता सरकारने महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्व सेवा बंद केल्या आहेत. तसेच कर्नाटकहून कोल्हापूरला येणाऱ्या कर्नाटक बसेसच्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात महाराष्ट्रातील एका बस चालकाला कन्नड भाषा येत नसल्यामुळे मारहाण करण्यात आली होती, त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तापले आहे.