Representational Image (Photo Credits: PTI)

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank Of India) खातेधारकांसाठी (Account Holders) काहीशी धक्कादायक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील सर्व्हरमधून हजारो ग्राहकांची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बँक बॅलन्स, खाते क्रमांक याच्यासह इतर महत्त्वाची माहिती लीक झाल्याची शक्यता आहे. बुधवारी (30/1/2019) मुंबईतील सर्व्हर कोणत्याही सुरक्षेशिवाय ठेवण्यात आला होता, त्यामुळे डेटा लीक झाल्याची दाट शक्यता आहे.

SBI आपल्या ग्राहकांसाठी SBI Quick सेवा प्रदान करते. या सेवेअंतर्गत ग्राहक आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरुन मिस कॉल किंवा एसएमएस करुन खात्यासंबंधित माहिती मिळवू शकतात. उदा. बॅलेन्स, मिनी स्टेटमेंट, इतर माहिती. SBI Quick सेवेबद्दल SBI च्या वेबसाईटवरही नमूद केले आहे. टेकक्रंचच्या रिपोर्टनुसार, असुरक्षितरित्या ठेवण्यात आलेला सर्व्हर हा SBI Quick सेवेचा भाग होता. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेऊन माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (SBI ग्राहकांनो बँकेच्या आलेल्या मेसेजकडे दुर्लक्ष करु नका, Bank Account वर 'हा' परिणाम होईल)

सर्व्हरचा पासवर्ड टाकणे बँकेकडून राहून गेले. त्यामुळे हॅकर्संना किंवा सर्व्हरमधून माहिती मिळण्याची ट्रिक माहिती असलेल्या व्यक्तींसाठी तर ही आयती संधीच होती. मात्र सर्व्हर किती वेळ असुरक्षित स्थितीत होता याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. बँकेने तात्काळ ही समस्या सोडवली, अशी माहिती टेकक्रंचने दिली आहे. मात्र एसबीआयकडून याप्रकरणाबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.