संप काळात उच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने 7 ते 10 या दरम्यान कर्मचाऱ्यांचे वेतन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही अद्याप पाच दिवस होऊनही वेतन झाले नाही. परिवहन आयुक्तांकडे विवेक भिमनवार यांच्याकडे एसटी महामंडळाचा प्रभार देण्यात आला असल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या नियोजनात यावेळी अडचणी आल्याचे दिसते आहे. नोव्हेंबर महिन्याच्या वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्याने पुन्हा एकदा कर्मचारी एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत आहे. (हेही वाचा - Accident News: पुण्याजवळ एकाच दिवशी दोन अपघात; खंडाळा जवळ एसटी बसचा अपघात तर दुसरीकडे पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅव्हल्सला आग)
सोमवारी कर्मचाऱ्यांचे वेतन होईल अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. मात्र, वेतन न झाल्यास महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्या वतीने एसटी महामंडळ प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तीगोटे यांनी सांगितले आहे. एसटी महामंडळाला तातडीने नियमित व्यवस्थापकीय संचालक पद भरण्याची गरज आहे. तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांनी आधीच एसटी महामंडळाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहे.