छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 223) यांचा जयंती उत्सव आगरा येथील लाल किल्ल्यावर (Red Fort in Agra) साजरा करण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (SSI) विभागाने परवानगी नाकारली. त्यामुळे आता शिवप्रेमींनी आता एसएसआयच्या निर्णयाला थेट दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. येत्या 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती आहे. त्यानिमित्त लाल किल्ल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास शिवप्रेमींनी परवानगी मागितली होती. ज्याला पराततत्व विभागाने नकार दिला. यावर आता आर आर पाटील फाऊंडेशनने (R R Patil Foundation) न्यायालयात दाद मागितली आहे.
याचिकाकर्त्या आरआर पाटील फाऊंडेशनने म्हटले आहे की, भारतीय पूरातत्व विभागनाने आम्हाला सास्कृतिक कार्यक्रम लाल किल्यावर घेण्यास नकार दिला. परंतू, या नकाराचे कारण मात्र त्यांनी दिले नाही. कोणतेही कारण न देता त्यांनी आमची मागणी फेटाळून लावली आहे. आमची मागणी योग्य असो अथवा नसो पण आम्हाला परवानगी नाकारताना एसएसआयने कारण द्यायला हवे, अशी फाऊंडेशनची भूमिका आहे. (हेही वाचा, Rajmata Jijau Jayanti 2023 HD Images: राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठी Wishes, Messages, Whatsapp Status द्वारा मावळ्यांना शुभेच्छा!)
शिवप्रेमींनीही पत्रांच्या माध्यमातून भारतीय पूराततत्व विभागाके मागणी केली होती. शिवाय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहून याचिकाकर्त्यांनी आपली मागणी लावून धरली होती. याचिकाकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, फाऊंडेशन आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिक यांचे आगरा येथील किल्ल्यासोबत भावनिक नाते आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सात पुत्रांना मुगल बादशाहा औरंगजेब याने कैद करुन ठवले होते.
याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले आहे की, यापूर्वी लाल किल्ल्यामध्ये असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात वास्तुकलेच्या आगा खान पुरस्काराशी संबंधित एका कार्यक्रमाचाही समावेश आहे. याचिकाकर्त्याचा दावा आहे की, पूराततत्व विभागाचे वर्तन हे भारतीय संवीधानाच्या अनुच्छेद 19 अन्वये याचिकाकर्त्याच्या मौलिक अधिकाराचे हनन आहे