दहावी बोर्ड परिक्षेचे (SSC Board Exam) निकाल काही दिवसांपूर्वीच लागले आहेत. त्यानंतर आता विद्यार्थी अकारावीच्या प्रवेशासाठी धडपड करत आहेत. परंतु अकरावीच्या प्रवेशावेळी अंतर्गत गुण ग्राह्य धरु नये असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गामध्ये संताप दिसून येत आहे. तर पालकांनी आता या प्रकारामुळे शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.
सीबीएसी आणि आयसीएसईच्या विद्यार्थांना अकरावी प्रवेशावेळी त्यांचे दहावीचे अंतर्गत गुण वगळावेत असे बोलले जात होते. त्यामुळे पालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धाव घेतली आहे. दहावी बोर्डाची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून 20 अंतर्गत गुण दिले जातात. मात्र गुण ग्राह्य न धरणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेवर परिणाम होईल. त्याचसोबत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण होईल असे सुद्धा पालकांचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा नाराजगी दिसून येत आहे.