Kishori Pednekar | (Photo Credits: Archived, edited)

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मुंबईच्या माझी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना मोठा दिलासा दिला आहे. कथीत एसआरए घोटाळा (SRA Scam Case) प्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोपपत्र दाखल करु नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यामुळे हे आरोप करणाऱ्या सोमय्या यांना हा मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.

किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याचा आरोप केला होता. पेडणेकर यांच्यावर आरोप करताना किशोरी पेडणेकर यांनी बेकायदेशीरपणे वरळी एसआरए इमारतीमधील सदनिका बळकावल्याचे म्हटले होते. या प्रकरणावरुन दाखल झालेल्या गुन्ह्यात मुंबई विशेष न्यायालयाने किशोरी पेडणेकर, त्यांचा मुलगा आणि त्यांच्याशी संबंधित एक फर्म अशा तिघांना नोटीस बजावली होती. (हेही वाचा, Kishori Pednekar: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

ट्विट

दरम्यान, न्यायालयाने किशोरी पेडणेकर यांना याच प्रकरणात या आधीही दिलासा दिला होता. वरळी येथील कथित घोटाळा प्रकरणात दाखल गुन्ह्यात किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. तसेच, त्यांचा मुलगा साईप्रसाद यालाही या प्रकरणात अटक झाल्यास त्याला 1 लाख रुपयांच्या जामीन अर्जावर सुटका करण्यात यावी, असे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने दिले होते.