पुणे विद्यापीठ अर्थात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU ) अंतिम वर्षाच्या सार्या सत्राच्या परीक्षा यंदा एमसीक्यू स्वरूपामध्ये म्हणजेच ऑनलाईन प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला आहे. सध्या कोविड 19 संकटामुळे शिक्षण वर्षाचा बोजवारा उडाला आहे. यंदाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये एमसीक्यु सोबत 4 सब्जेक्टिव्ह प्रश्नांचा देखील समावेश केला जाईल असे सांगण्यात आहे आहे. दरम्यान यंदा पहिल्या वर्षाच्या परीक्षा या 20 मार्च तर इतर वर्षाच्या परीक्षा 30 मार्चपासून होतील.
नुकत्याच पुणे विद्यापीठात झालेल्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत यंदाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्याक्रमांच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या परीक्षा ऑनलाईन असाव्यात असा आग्रह होता. त्यानुसार अंतिम वर्ष वगळता इतर सार्या वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन होतील. अंतिम वर्षाची परीक्षा मात्र 50 गुण एमसीक्यू आणि 20 मार्कांचे सब्जेक्टिव्ह अशी एकूण 70 गुणांची होईल.
पुणे विद्यापीठामध्ये या ऑनलाईन परिक्षांमध्ये गैर व्यवहार रोखण्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धती वापरली जाणार आहे. त्यामध्ये कॅमेर्याच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षेमध्ये कोणते गैर प्रकार तर होत नाहीत ना? याची देखील चाचपणी केली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन परिक्षेदरम्यान काही गैरप्रकार आढळल्यास 5 संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात पण त्यानंतर देखील संबंधोत विद्यार्थ्यामध्ये सुधार न दिसल्यास कॉपी प्रकाराच्या कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. Savitribai Phule Pune University च्या पदवी अंतिम वर्षाच्या परीक्षा प्रश्नावलीत PoK चा आक्षेपार्ह उल्लेख, चूक लक्षात येताच पुणे विद्यापीठाकडून माफी मागत संबंधित विभागाकडून स्पष्टीकरण मागवल्याची माहिती.
दरम्यान अंतिम वर्षांच्या परीक्षेसोबत इतर वर्षाच्या परीक्षांसाठी अभ्यासक्रम पूर्ण ठेवावा की कमी करावा याचा अभ्यास करण्यासाठी डॉ. संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापन नेमण्यात आली आहे. या उपसमितीच्या अहवालानंतर परीक्षांसंबंधी सविस्तर परिपत्रक व वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी दिली.