मुंबई शहरामध्ये आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास संबंधित व्यक्तीला होणारा दंड आता 200 रूपयांवरून 1200 रूपये करण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिका जाहीर करण्याची शक्यता आहे. मुंबई मिरर च्या वृत्तानुसार, बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी या दंडामध्ये वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे आता हा प्रस्ताव पालिकेच्या जनरल बॉडी समोर आहे. त्यांच्या मंजुरीनंतर तो राज्य सरकारच्या स्टेट पॅनेल समोर जाणार आहे. कारण याच्याद्वारा Greater Mumbai Cleanliness and Sanitation Byelaws 2006 मध्ये बदल केला जाणार आहे. Coronavirus: सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे COVID19 चा प्रसार वाढू शकतो असे नमूद करणारी सुचनावली ICMR यांच्याकडून जारी.
मागील कित्येक वर्षांपासून मुंबई शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास नागरिकांकडून पालिकेच्या मार्शल्सकडून 200 रूपये दंड आकारला जात असे. काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने यावरून पालिकेला दंडाची किंमत 200 रूपये का आहे? याच कारणावरून जर पोलिस 1200 रूपये आकारत असतील तर पालिका इतकी कमी दंडाची रक्कम का आकारत आहे.
दरम्यान बीएमसीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मागील सहा महिन्यांत मुंबई महानगर पालिकेने सउमारे 28.67 लाख रूपये दंडाच्या स्वरूपात आकारले आहेत. मुंबईत सर्वाधिक ही दंडाची रक्कम एल वॉर्डमधून गोळा करण्यात आली आहे. हा वॉर्ड चुनाभट्टी, कुर्ला, साकीनाका असा आहे.
कोरोना संकट काळामध्ये पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करत पालिकेचे मार्शल्स नागरिक मास्क नीट वापरत आहेत ना? आणि कोणी सार्वजनिक ठिकाणी थुंकून नियम मोडत नाही ना? हे तपासत आहेत. तसे आढळल्यास संबंधित व्यक्तीला दंडाची पावती फाडावी लागत आहे.