मुंबईकरांसाठी लोकल सेवा ही लाईफलाईन आहे. मात्र आजपासून पुढील आठवड्याभरासाठी रविवार वगळता इतर दिवशीही मेगा ब्लॉग घेण्यात येत असल्याने चाकरमनी मुंबईकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. मध्यरेल्वेतर्फे आजपासून ठाणा आणि दिवा दरम्यान पाच व सहा मार्गिकांसाठी कळवा येथे काम सुरू करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक
मध्य रेल्वेने 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात विशेष मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. या मेगा ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वेवरील काही लोकल्सच्या फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कोणकोणत्या लोकल्स रद्द झाल्या ?
सकाळी ५.५७ची डोंबिवली-सीएसएमटी (२८ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत रद्द )
संध्याकाळी. ५.१५ची ठाणे - दादर लोकल (२७सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत रद्द )
संध्याकाळी. ५.५८ची ठाणे - डोंबिवली लोकल (२७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत रद्द )
रात्री ११.१२ची सीएसएमटी - ठाणे लोकल (२८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरपर्यंत रद्द )
कोणकोणत्या लोकल्सच्या वेळेत बदल करण्यात आला ?
२८ सप्टेंबर ते ७ सप्टेंबरपर्यंत सकाळी 7.29 ची डोंबिवली लोकल ठाण्याहून 7.52 ला सोडण्यात येईल.
संध्याकाळी 5.53 आणि ६.२२ची सीएसएमटीहून सुटणारी ट्रेन ६ ऑक्टोबरपर्यंत ठाण्यापर्यंतच चालवण्यात येईल.