लग्नाच्या वाढदिवसानिमित्त Devendra Fadnavis यांना पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून विशेष शुभेच्छा; पहा पोस्ट
देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस (Photo Credit : Twitter)

राज्यात राष्ट्रपती राजवट सुरु आहे, अनेक पक्षांमध्ये सत्ता स्थापनेसाठी बैठका पार पडत आहेत. अशात राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या दिवसाचे औचित्य साधून त्यांच्या पत्नी अमृता फडणविस (Amruta Fadnavis) यांनी हटके अंदाजात त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमृताजींनी सोशल मिडीयावर याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःचा व देवेंद्र फडणविस यांचा एकत्र एक फोटो वापरला आहे. लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही या दोघांमधील प्रेम फोटोमधूनही दिसून येते. म्हणूनच महाराष्ट्राचे दुसरे सर्वात युवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक आयडियल कपल म्हणून पहिले जाते.

अमृता फडणवीस यांची पोस्ट -

अमृता फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘लोकांचे नेते देवेंद्र फडणवीस यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच आजच्या दिवसाबद्दल ज्यांनी ज्यांनी शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचे मनापासून आभार’. देवेंद्र फडणवीस वयाच्या केवळ 27 व्या वर्षी महापौर बनले होते, माजी मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी राजकारणामागे त्यांच्या पत्नी अमृता यांचा मोठा वाटा आहे.

देवेंद्र फडणवीस यांची काजोल ही आवडती अभिनेत्री. अमृता यांना पाहिल्यावर 'यू काजोल सारखी दिसतेस' असे म्हणत, त्यांनी अमृताजींना प्रपोज केले होते. या दोघांचे लग्न त्यावेळी नागपुरात चर्चेचा विषय बनले होते.अमृता या नागपूरचे प्रसिद्ध डॉक्टर चारू रानडे आणि नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या. (हेही वाचा: पहा Devendra Fadnavis यांच्या कामाविषयी काय म्हणाल्या पत्नी Amruta Fadnavis)

देवेंद्रजी आमदार म्हणून दुस-यांदा निवडून आल्यानंतर या दोघांचे लग्न झाले. अमृता फडणवीस या अॅक्सिस बँकेत असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. देवेंद्रजी आणि अमृता यांचा प्रेमविवाह आहे. माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अमृता या अगदी ढालीसारख्या देवेंद्रजींच्या मागे उभ्या आहेत. देवेंद्र आणि अमृता यांना देविजा नावाची मुलगी आहे.