प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

Mumbai: येत्या काही दिवसात मुंबईकरांना कार पार्किंसाठी 5 पट अधिक पैसे मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दक्षिण मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉप्लेक्स,फोर्ट,लोअर परेल आणि गोरेगावा या ठिकांणी वाढीव दर लागू होणार असल्याची शक्यता आहे. दररोज मुंबईतील नागरिकांच्या खाजगी वाहनांच्या पार्किंमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीच उद्भवत आहे असे महापालिका अजोय मेहता यांनी म्हटले आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूकीचा नागरिकांना लाभ घेता येण्यासाठी पार्किंच्या दरात 5 पटीने अधिक दरवाढ करण्यात येणार आहे. (हेही वाचा-फेसबुकवरून मैत्री करून, जेष्ठ महिलेच्या घरी 8 लाखांची चोरी)

तर वाहतुक तज्ञांच्या मते, वाहतुक दरवाढीमुळे वाढत्या रहदारीवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनाला प्रोत्साहन मिळून अपघाताची संख्या कमी होईल. मात्र ज्या नागरिकांच्या मोठ्या गाड्या असणार आहेत त्यांच्यासाठी जास्त पार्किंगचे दर आकारण्यात यावे असे रोड सेफ्टी फाऊंडेशन विश्वस्त अशुतोष अत्रे यांनी स्पष्ट केले आहे.