मुंबई मध्ये दोन दिवसांपूर्वी रात्री साऊथ कोरियन युट्युबर सोबत दोन तरूणांनी छेडछाडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच काही तासांमध्ये पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. या घटनेवर S Korean YouTuber Hyojeong Park हीने आपली प्रतिक्रिया देत पोलिसांचे आभार मानत झटपट झालेल्या कारवाईचं कौतुक देखील केले आहे.
Hyojeong Park ने ANI ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितले की," माझ्यासोबत असा प्रकार इतर देशांमध्येही झाला. तेथेही पोलिसांना घटनेची माहिती दिली होती पण भारतामध्ये तातडीने झालेली कारवाई पूर्वी कधीच झाली नव्हती. मुंबई मध्ये माझा 3 आठवड्यांचा राहण्याचा प्लॅन आहे. हा प्लॅन आता मी अजून वाढवणार आहे. एका वाईट घटनेमुळे मी माझा ट्रॅव्हल प्लॅन बदलणार नाही. तसेच मला भारताबद्दल चांगल्या गोष्टी इतरांनाही दाखवायच्या आहेत." असं ती म्हणाली आहे. नक्की वाचा: Korean Female YouTuber Molestation: कोरियन महिला युट्युबर विनयभंग प्रकरणी दोघांना अटक, मुंबई पोलिसांची तत्काळ कारवाई .
पहा ट्वीट
I don't want this one bad incident to ruin my whole travel and my passion to show wonderful India to other countries: South Korean YouTuber Hyojeong Park, who was harassed in Mumbai while live streaming
Both accused have been arrested and sent to 1-day Police custody pic.twitter.com/5zHrnOmmEy
— ANI (@ANI) December 1, 2022
पोलिसांची माहिती
View this post on Instagram
दरम्यान मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे त्यांना 1 दिवसाची पोलिस कोठडी झाली आहे. मुलीच्या छेडछाडीची घटना 29 नोव्हेंबरच्या रात्रीची आहे. Hyojeong Park हीने घडला प्रकार ट्वीट केला आहे. पोलिसांना देखील तिने व्हिडीओ ट्वीट करत घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी . कलम ३५४, ३५४(ड), ३४ अंतर्गत कारवाई करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबई निर्भया पथकाद्वारा गस्त घातली जाते. रात्री अपरात्री महिलांना 103 या नंबरवर मदत मिळू शकते.